या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबधी व ६ ते १४ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा सामावेश राहील. या विषयासाठी अध्यापत शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत विहित सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.